Posts

राजांचा राजगड - स्वराज्याची पहिली राजधानी

Image
पुण्यात आल्यावर ट्रेकिंग ला सुरवात झाली ती राजगडापासून. राजगड चढायला सोपा नाही असं अनेकवेळा ऐकलं होतं पण "अनुभव हीच परीक्षा" असा विचार करून राजगड ला जायचं नक्की केलं. मी लगेच प्रसाद ला फोन करून माझा प्लान सांगितला आणि शनिवार - ५ ऑक्टोबर घटस्थापनेला राजगडाच्या पद्मावती देवीच दर्शन घेण्याचं ठरलं. शिवरायांचा बराचसा काळ हा राजगडावर गेलेला असल्यामुळे राजगडाला मराठ्यांच्या इतिहासात मोठे स्थान आहे. अफजलखान वधासाठी महाराज इथूनच बाहेर पडले, सुरतेच्या लुटीची आखणी ही राजगडावरच झाली, शाहिस्तेखानावर हल्ला करायला महाराज इथूनच निघाले, पन्हाळ्याचा वेढा फोडून महाराज विशाळगडावर गेलेत आणि तिथून परत आलेत ते राजगडाला, आग्र्याहून सुटून महाराज आलेत ते राजगडावरच, अनेक स्वाऱ्यांची खलबत ही राजगडावर झालीत आणि शहाजीराजे गेल्याची बातमी अली ती पण महाराज राजगडावर असतानाच. या सगळ्यांमुळे राजगडाला अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वी मुरुंबदेवाचा म्हणून ओळखला जाणारा हा डोंगर महाराजांनी बांधून काढला आणि त्याच राजगड असं नामकरण केलं.  ट्रेक ची सुरवात कुठून करायची वगैरे माहिती मी काढून ठेवली होती. "किल्...

जरसेश्वर - निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव

Image
ऑफिस मध्ये काम नसताना मी भटकंती साठी नविन जागा शोधत असतो, आणि असच एक दिवस शोध घेत असताना जरसेश्वर या जागे बद्दल माहिती मिळाली. लगेच अक्षय आणि प्रसाद ला या नविन जागे बद्दल सांगितल. ते दोघही तयार झालेत आणि दुसऱ्या दिवशी असलेला शनिवार सत्कारणी लागला.  जरसेश्वर हे एका टेकडीवर वसलेल एक छोटस गाव. इथे जायला पुर्वी कच्चा रस्ता होता पण आता चांगला पक्का रस्ता आहे. कोथरुड डेपो पासुन जरसेश्वर फक्त ३० किमी. असल्याने लवकर उठुन जायची घाई नव्हती. सकाळी आरामात उठुन नाश्ता करुन ११ वाजता आम्ही जरसेश्वर ला जायला निघालो. वारजे, शिवणे या रस्त्यानी NDA रोड ला लागलो. NDA रोड नी थोड अंतर पुढे गेल की एक रस्ता डाव्या हाताला खडकवासला धरणाकडे जातो आणि दुसरा रस्ता सरळ धरणाच्या बाजुनी कुडजे, मांडवी या गावांकडे जातो. ही गाव पार करुन पुढे गेल की एक वाट जरसेश्वर ला जाते. धरणाच्या बाजुनी जाणारा रस्ता खुपच सुंदर आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यानी जाताना सगळीकडे हिरवळ दिसते. मांडवी गावानंतर १-२ किमी वर स्प्लेंडर कन्ट्री (splendour country) क्लब आहे. या क्लब च्या १००-२०० मी. आधी उजव्या हाताला वर जाणारा रस्ता जरसे...

दूधसागर

Image
पुण्यात आल्यापासुन भरपूर भटकंती केली, अनेक ट्रेक केलेत, बरेच धबधबे पाहिलेत आणि मग ठरल की आता दूधसागर धबधबा बघायचा. मित्रमंडळी तर तयार होतीच. लगेच कामाला लागलो आणि सगळी महिती जमवली. पावसाळ्यात केव्हा जाणं योग्य राहिलं ते ठरवल आणि मित्र-मैत्रिणींना कळवलं. तारिख नक्की झाली आणि १४ जणांचे ११ सप्टेंबर चे रेल्वे तिकिट्स बूक केलेत. सगळी तयारी झाली होती. सगळेच खुप उत्साहात होते (कारण चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात या धबधब्यासमोर रेल्वे थांबते हे सगळ्यांनीच पाहिलेल होतं.) भारतातील सर्वाधिक उंचीच्या धबधब्यांपैकी एक असलेला दूधसागर (३१० मी) हा धबधबा गोआ आणि कर्नाटक राज्यांच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांडोवी नदीवर आहे. प्रवासाला सुरवात झाली. गाडी मध्ये सगळ्यांनीच खुप धमाल केली. मी आमच्या स्वयंपाक वाल्या काकुंकडुन सगळ्यांना पुरतील इतके पराठे करुन घेतले होते. रात्री पराठ्यांवर सगळ्यांनी ताव मारला. सकाळी ४ वाजता उठायच आहे हे मी आधिच सांगून ठेवल होत त्यामुळे सगळे लवकर झोपले. पहाटे बरोबर ३.४५ ला उठलो आणि बाकी मंडळींना उठवल. सगळे पटापट तयार झालेत. बरोबर ४.३० ला गाडी चा वेग कमी झाला आणि १५-२० सेकंद करता...

२०० किमी बी.आर.एम. चा थरार

Image
२०१५ साली कंपनीचा सायकलींग क्लब जॉइन केला आणि १२ वी नंतर बंद झालेल्या सायकलींग ला पुन्हा सुरुवात झाली . खुप विचारांती मी नविन सायकल घ्यायच ठरवल आणि सायकलींग क्लब च्या अनुभवी सदस्यांच्या सल्ल्याने एप्रिल २०१६ मधे सायकल घेतली . दर आठवड्याला १०० किमी तरी सायकल चालवायची अस ठरल आणि मग रोज सकाळी उठुन १५ - २० किमी सायकलींग ला सुरवात झाली . याच दरम्यान बी . आर . एम . ( Brevet des Randonneurs Mondiaux ) या सायकलींग च्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली . बी . आर . एम . मधे १ विशिष्ठ अंतर दिलेल्या वेळेत पुर्ण करायचे असते . बी . आर . एम . २०० , ३०० , ४०० आणि ६०० किमी च्या असतात आणि हे अंतर अनुक्रमे १३ . ५ , २० , २७ आणि ४० तासात पुर्ण करायचे असते . सर्वात मह्त्वाचे म्हणजे बी . आर . एम . करताना स्पर्धक हा सर्व बाबतित स्वयंपूर्ण असला पाहिजे . म्हणजे सायकल चालवताना येणारी सगळे आव्हाने त्यानी एकट्यानी पूर्ण करायची , अगदी सायकल चे पंचर जोडण्यापासुन तर खाण्याच्या सोयीपर्यंत . इतक जास्त अंतर स...