राजांचा राजगड - स्वराज्याची पहिली राजधानी
पुण्यात आल्यावर ट्रेकिंग ला सुरवात झाली ती राजगडापासून. राजगड चढायला सोपा नाही असं अनेकवेळा ऐकलं होतं पण "अनुभव हीच परीक्षा" असा विचार करून राजगड ला जायचं नक्की केलं. मी लगेच प्रसाद ला फोन करून माझा प्लान सांगितला आणि शनिवार - ५ ऑक्टोबर घटस्थापनेला राजगडाच्या पद्मावती देवीच दर्शन घेण्याचं ठरलं. शिवरायांचा बराचसा काळ हा राजगडावर गेलेला असल्यामुळे राजगडाला मराठ्यांच्या इतिहासात मोठे स्थान आहे. अफजलखान वधासाठी महाराज इथूनच बाहेर पडले, सुरतेच्या लुटीची आखणी ही राजगडावरच झाली, शाहिस्तेखानावर हल्ला करायला महाराज इथूनच निघाले, पन्हाळ्याचा वेढा फोडून महाराज विशाळगडावर गेलेत आणि तिथून परत आलेत ते राजगडाला, आग्र्याहून सुटून महाराज आलेत ते राजगडावरच, अनेक स्वाऱ्यांची खलबत ही राजगडावर झालीत आणि शहाजीराजे गेल्याची बातमी अली ती पण महाराज राजगडावर असतानाच. या सगळ्यांमुळे राजगडाला अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वी मुरुंबदेवाचा म्हणून ओळखला जाणारा हा डोंगर महाराजांनी बांधून काढला आणि त्याच राजगड असं नामकरण केलं. ट्रेक ची सुरवात कुठून करायची वगैरे माहिती मी काढून ठेवली होती. "किल्...