दूधसागर
पुण्यात आल्यापासुन भरपूर भटकंती केली, अनेक ट्रेक केलेत, बरेच धबधबे पाहिलेत आणि मग ठरल की आता दूधसागर धबधबा बघायचा. मित्रमंडळी तर तयार होतीच. लगेच कामाला लागलो आणि सगळी महिती जमवली. पावसाळ्यात केव्हा जाणं योग्य राहिलं ते ठरवल आणि मित्र-मैत्रिणींना कळवलं. तारिख नक्की झाली आणि १४ जणांचे ११ सप्टेंबर चे रेल्वे तिकिट्स बूक केलेत. सगळी तयारी झाली होती. सगळेच खुप उत्साहात होते (कारण चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात या धबधब्यासमोर रेल्वे थांबते हे सगळ्यांनीच पाहिलेल होतं.) भारतातील सर्वाधिक उंचीच्या धबधब्यांपैकी एक असलेला दूधसागर (३१० मी) हा धबधबा गोआ आणि कर्नाटक राज्यांच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांडोवी नदीवर आहे. प्रवासाला सुरवात झाली. गाडी मध्ये सगळ्यांनीच खुप धमाल केली. मी आमच्या स्वयंपाक वाल्या काकुंकडुन सगळ्यांना पुरतील इतके पराठे करुन घेतले होते. रात्री पराठ्यांवर सगळ्यांनी ताव मारला. सकाळी ४ वाजता उठायच आहे हे मी आधिच सांगून ठेवल होत त्यामुळे सगळे लवकर झोपले. पहाटे बरोबर ३.४५ ला उठलो आणि बाकी मंडळींना उठवल. सगळे पटापट तयार झालेत. बरोबर ४.३० ला गाडी चा वेग कमी झाला आणि १५-२० सेकंद करता...