जरसेश्वर - निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव
ऑफिस मध्ये काम नसताना मी भटकंती साठी नविन जागा शोधत असतो, आणि असच एक दिवस शोध घेत असताना जरसेश्वर या जागे बद्दल माहिती मिळाली. लगेच अक्षय आणि प्रसाद ला या नविन जागे बद्दल सांगितल. ते दोघही तयार झालेत आणि दुसऱ्या दिवशी असलेला शनिवार सत्कारणी लागला. जरसेश्वर हे एका टेकडीवर वसलेल एक छोटस गाव. इथे जायला पुर्वी कच्चा रस्ता होता पण आता चांगला पक्का रस्ता आहे. कोथरुड डेपो पासुन जरसेश्वर फक्त ३० किमी. असल्याने लवकर उठुन जायची घाई नव्हती. सकाळी आरामात उठुन नाश्ता करुन ११ वाजता आम्ही जरसेश्वर ला जायला निघालो. वारजे, शिवणे या रस्त्यानी NDA रोड ला लागलो. NDA रोड नी थोड अंतर पुढे गेल की एक रस्ता डाव्या हाताला खडकवासला धरणाकडे जातो आणि दुसरा रस्ता सरळ धरणाच्या बाजुनी कुडजे, मांडवी या गावांकडे जातो. ही गाव पार करुन पुढे गेल की एक वाट जरसेश्वर ला जाते. धरणाच्या बाजुनी जाणारा रस्ता खुपच सुंदर आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यानी जाताना सगळीकडे हिरवळ दिसते. मांडवी गावानंतर १-२ किमी वर स्प्लेंडर कन्ट्री (splendour country) क्लब आहे. या क्लब च्या १००-२०० मी. आधी उजव्या हाताला वर जाणारा रस्ता जरसे...